breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनसेच्या मागणीनंतर निगडी उड्डाणपुलाच्या दोन्ही ‘लेन’ वाहतुकीसाठी सुरू

  • आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत लेनचे लोकार्पण
  • मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांचा खंबीर पाठपुरावा

पिंपरी / महाईन्यूज

निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे लेनचे काम पूर्ण झालेले असताना देखील पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी वाहतुकीसाठी खुला करत नव्हते. नागरिकांच्या हितासाठी दोन्ही लेन सुरू करण्याची मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. त्याचा विचार करून आज या पुलाच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या.

उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता. दोन्ही पक्षाच्या वादात नागरिकांच्या सोयीचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोणाच्याही हस्ते उद्घाटन करा, तत्पुर्वी पूर्ण झालेल्या दोन्ही लेन नागरिकांना वाहतुकीसाठी खुल्या करा, अशी सर्वस्वी मागणी मनसेचे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी केली होती. जर दोन्ही लेन सुरू नाही केल्या तर मनसे स्टाईलने आम्ही पुलाचे उद्घाटन करू, असा इशारा त्यांनी दिला होता.

त्यावर नागरिकांच्या हिताचा विचार करून चिखले यांची मागणी रास्त असल्याचे मत महापौर माई ढोरे यांनी मांडले होते. त्यांनी तातडीने आयुक्त हर्डीकर यांच्याशी चर्चा करून आज उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले. आज आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत उड्डाण पुलावरील पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे या दोन्ही लेनचे उद्घाटन करून वाहतुकीसाठी दोन्ही रस्ते खुले करण्यात आले.

कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, कला, क्रिडा, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या सीमा सावळे, आशा धायगुडे- शेंडगे, शैलजा मोरे, कमल घोलप, सुमन पवळे, नगरसदस्य अमित गावडे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, सतिश इंगळे, विजय भोजणे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

पुलामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार

निगडी येथे उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाची लांबी सुमारे ८४९ मीटर असून रुंदी सुमारे १७.२ मीटर आहे तर उंची सुमारे ८.५ मीटर एवढी आहे. याकामी सुमारे २४ कोटी ६२ लाख इतकर खर्च करण्यात आलेला आहे. पुणे मुंबई रस्त्याला समांतर उड्डाणपूलाखालून बीआरटी टर्मिनल व पीएमपीएमएलच्या डेपोकडून सर्व बसेस सहज धावणार असून प्रवासाच्या वेळेत व इंधन बचत होणार असून वायू प्रदुषणात घट होऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button