मनसेच्या महिला शहराध्यक्षपदी अश्विनी बांगर
पिंपरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी अश्विनी बांगर यांची निवड करण्यात आली आहे. तर, भोसरी विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनसेचे नुकताच चिंचवड येथे मेळावा पार पडला. मनसेच्या नेत्या रिटा गुप्ता, मनसेचे नेते गणेश सातपुते, रणजित शिरोळे, पुण्याचे माजी नगरसेवक किशोर शिदे, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
महिला कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:- अश्विनी बांगर (शहराध्यक्षा), सीमा बेलापूरकर (सचिव), अनिता पांचाळ (चिंचवड), संगिता देशमुख (भोसरी), स्नेहल बांगर (पिंपरी, उपाध्यक्षा), रुपाली गिलबिले , सुजाता काटे (भोसरी, विभागअध्यक्षा), विद्या कुलकर्णी, अदिती चावरीयॉ (पिंपरी, विभागअध्यक्षा), सुनिता गायकवाड (चिंचवड, विभागअध्यक्षा) मीना गटकळ (शहर सहसचिव)
पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 10 च्या उपविभागअध्यक्षपदी नितीन चव्हाण, प्रभाग 15 ओमकार पटोळे, प्रभाग 19 मिलिंद सोनवणे, प्रभाग 20 गुरुनाथ शिनगारे, प्रभाग 21 अजय कुदळे, प्रभाग 30 एॅलेक्स झँडर यांची उपविभागअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 14 च्या शहरसंघटकपदी विष्णू चावरिया तर प्रसिद्धीप्रमुखपदी करण मूर्ती यांची नेमणूक करण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 18 च्या उपविभागअध्यक्षपदी रवी सूर्यवंशी, प्रभाग 22 सचिन कळकुंभे,निलेश नेटके, प्रभाग 27 सचिन कांबळे, प्रभाग 29 अनिल भुजबळ, प्रभाग 31 सुरेश सकट, प्रभाग 32 महेश केदारी यांची उपविभागअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभेच्या शहर संघटकपदी शांतीलाल दहिफळे, फय्याज नदाफ यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भोसरी विधानसभा अध्यक्षपदी राहुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक तीनच्या उपविभागअध्यक्षपदी गणेश लोणारे, स्वप्निल जरे, प्रभाग सहाच्या संतोष बो-हाडे, प्रभाग आठच्या प्रतिक जिते, प्रभाग 11 संतोष यादव, सखाराम मटकर, प्रभाग 12 सचिन मेलपगारे, प्रभाग 13 च्या उपविभागअध्यक्षपदी अक्षय कारंडे, उत्कर्ष भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग एकच्या प्रसिद्धीप्रमुखपदी नाथा शिंदे, प्रभाग दोन सिद्धराम कोळी, प्रभाग सहा गणेश पाटील, प्रभाग 13 च्या प्रसिद्धीप्रमुखपदी नारायण पठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक आठच्या शहर संघटकपदी महेंद्र यादव, प्रभाग 12 सुशांत साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.