मधुकर बच्चे युवा मंचतर्फे मोफत आरोग्य शिबिर
![Free health camp by Madhukar Bachche Yuva Manch](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/bacche.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
मधुकर बच्चे युवा मंचच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक १८ केशवनगर चिंचवड मध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह आदी तपासण्या करण्यात आल्या. या शिबरामध्ये सुमारे 220 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन तपासनी करून घेतली. पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष संतोष खिंवसरा यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे, भाजपा भटके विमुक्त युवा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ शिंदे, बबन बच्चे, रणजित बेंद्रे, किरण वाल्हेकर, मारुती, राजू म्हसकर, युवराज सोमवंशी, द्वारकानाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते. आर्करे या कंपनीची या शिबिरास विशेष सहकार्य मिळाले. मधुकर बच्चे यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या आरोग्य तपासणी करून वेळीच आजाराचे निदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वरित उपचार करता येते. आजार देखील वाढीस लागत नाहीत. नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.