breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी व्हीजन : २०२० : आंद्रा, भामा-आसखेडचे पाणी पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीक्षेपात!

–       आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती

–       महापालिका स्थायी समितीची प्रकल्पाच्या खर्चाला मंजुरी

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवडकरांना आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी मिळण्याचा प्रकल्प आता दृष्टीक्षेपात येऊ लागला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून प्रगतीपथावर असलेल्या या प्रकल्पांतर्गत जलवाहिनीच्या कामासाठी खर्चाला बुधवारी महापालिका स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली.

बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सभापती संतोष लोंढे होते. या बैठकीत पाणी पुरवठा विभागाकडील चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जलवाहिनी आणि अन्य कामांसाठी ६१ कोटी १८ लाख ८९७ रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. तसेच, नवलाख उब्रे येथील जलवाहिनी आणि अन्य कामांसाठी तब्बल १०० कोटी ९६ लाख ५ हजार २५४ रुपयांच्या खर्चाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांना आता गती मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून आगामी ४० वर्षांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून पवना धरणातील पाणी आरक्षणाला पर्यायी स्त्रात उपलब्ध व्हावा. यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून पिंपरी-चिंचवडसाठी पाणी मिळवण्यासाठी पुढाकार घेतला होता.

दरम्यान, महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. महापालिका प्रशासनाने संबंधित पाणी आरक्षणाबाबत शासकीय शुल्क न भरल्यामुळे पाटबंधारे प्रशासनाने पाणी आरक्षण रद्द केले होते. मात्र, पुन्हा आमदार लांडगे यांनी पाठपुरावा करुन संबंधित शुल्क भरण्यासाठी महापालिका प्रशासनाला सकारात्मक भूमिका घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या मुद्दावर तोडगा निघाल्यानंतर आंद्रा आणि भामा आसखेडमधून पाणी उचण्यासाठी जलवाहिनी आणि आवश्यक यंत्रणा उभा करण्यासाठी दोन प्रकल्पांसाठी सुमारे १६१ कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button