breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणावर आमदार लांडगे गट ‘चिडीचूप’

  • शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट
  • ओपीडी सुरू करण्याची केली मागणी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – स्थायी समिती सभापती पदावर दावा दाखविणा-या भोसरीच्या नगरसेवकांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे आज अनोखी मागणी केली आहे. भोसरी रुग्णालयात ओपीडी लवकर सुरू करण्यात यावी, अशी त्यांची सामुदायिक मागणी असल्याचे महापौर राहूल जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. परंतु, भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाला शहराच्या सर्वच स्तरातून विरोध होत असताना आमदार महेश लांडगे समर्थकांच्या शिष्टमंडळाने मात्र, विरोध दर्शविला नाही. त्यावरून या अनोख्या मागणीमुळे महापालिकेत भोसरीच्या गटाविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा घाट पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने घातला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रुबी अलकेअर ओपीडीच्या जुलमी व्यवस्थापनामुळे सर्वसामान्य रुग्णांवर होणारा अन्याय पुन्हा भोसरी रुग्णालयात सुरू होणार. या भितीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील संबंध सामाजिक संस्था, संघटना, विरोधी पक्षाचे पदाधिकारी आणि सत्ताधारी भाजपच्या मातब्बर नगरसेवकांनी खासगीकरणाला कडाडून विरोध केला आहे. ज्यांनी भाजपची पाळेमुळे शहरात खोलवर रुजविली ते भोसरीचे स्व. अंकुशराव लांडगे यांचे आप्तेष्ट नगरसेवक रवी लांडगे खासगीकरणाच्या विरोधात शहरात विराट महामोर्चा काढणार आहेत. असा इशारा त्यांनी दिलेला आहे.

आयुक्तांवरही दबावतंत्र

भाजपचे आमदार लांडगे गटाच्या नगरसेवकांनी स्थायी समिती सभापती पदावर दाव दाखवून पक्षाला आज आव्हान दिले आहे. हे आव्हान देतानाच त्यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे भोसरी रुग्णालयात लवकर ओपीडी सुरू करण्याची अनोखी मागणी केली आहे. मात्र, खासगीकरणाच्या विरोधात शिष्टमंडळातील एकाही बहाद्दर नगरसेवकाने आयुक्तांना आव्हान दिले नाही. उलट खासगीकरणावर एकही शब्द न उच्चारता तातडीने ओपीडी सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापती पदासाठी पक्षावर आणि रुग्णालयाच्या खासगीकरणासाठी आयुक्तांवर दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा संशय राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button