breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत ललित कला अकादमीच्या उभारणीचा मार्ग मोकळा

पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता

‘कलानगरी’ असा बिरुद लावण्यास पिंपरी-चिंचवड सज्ज

पिंपरी । प्रतिनिधी
भोसरीत आता केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत ललित कला अकदमी उभारण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर आता ‘कलानगरी’ असे बिरुद लावण्यास सज्ज झाले आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातील सुमारे १५ एकर जागेवर ही अकादमी उभारण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यांमध्ये ललित कला अकादमी केंद्र उभारण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्र हा कलेची पंढरी असतानाही राज्यात अद्याप असे केंद्र उभारले नव्हते. परिणामी, अप्रत्यक्षपणे कलावंतांची उपेक्षा झाली होती. अशाप्रकारची कला अकादमी महाराष्ट्रात उभारली जावे. याकरिता राज्यातील शिल्पकार मूर्तिकार चित्रकार यांनी दिल्ली दरबारी पाठपुरावा केला.
दरम्यान, ललित कला अकादमी पिंपरी-चिंचवड परिसरात उभारण्यात यावी. याकरिता ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तमराव पाचर्णे, भाजपा आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी एकत्रितपणे पाठपुरावा सुरू केला होता. त्याला यश मिळाले. आता महापालिका प्रशासनाने जागा आणि पायाभूत सोयी-सुविधांबाबत तयारी करण्यात येणार आहे.

कलाकारांना व्यासपीठ निर्माण होईल : आमदार लांडगे
औद्योगिकनगरी, कामगार नगरी, ॲटो हब, आयटी सिटी, स्पोर्टस सिटी, एज्युकेशन हब आणि आता आपल्या शहराची ओळख कलानगरी व्हावी. यासाठी भोसरी व्हीजन- २०२० च्या माध्यमातून आम्ही ललित कला अकादमीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या सहाकर्यातून सर्वांनी आपआपल्या परीने प्रयत्न केले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ललित कला अकादमी उभारल्याने शहराच्या लौकिकात भरच पडणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात पिंपरी-चिंचवडला ही अकादमी साकारली जात आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ निर्माण होईल. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button