भोसरीतील तीन व्यावसायिकांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/IMG-20180612-WA0087.jpg)
पिंपरी – आरोग्याला घातक ठरणा-या प्लास्टिक कॅरिबॅग्ज वापरल्यामुळे भोसरीतील तीन व्यावसायिकांवर महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.
प्लास्टिक पिशव्या वापरण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्लास्टिक कॅरिबॅग्ज वापरणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश आठही क्षेत्रीय कार्यालयांतील सहायक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार ई क्षेत्रीय कार्यालयातील प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या भोसरीतील तीन व्यावसायिकांवर अधिका-यांनी आज मंगळवारी (दि. 12) कारवाई केली आहे.
शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या व्यावसायिकांकडून पंधरा हजार रुपयांचा दंड आकारला आहे. सहायक आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, मुख्य आरोग्य निरीक्षक अभिजीत गुमास्ते, अरोग्य निरीक्षक चंद्रकांत रोकडे, राजू साबळे आणि शंकर घाटे यांनी ही कारवाई केली आहे.