भोसरीचे अपक्ष उमेदवार विलास लांडे याना ‘कपबशी’चे चिन्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/vilas-lande-2_20180476544-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदार संघातून आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढणारे माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने त्यांना ‘कपबशी’ हे चिन्ह मिळाले आहे. निवडणूक विभागाने अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे आज वाटप केले आहे. तर, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख यांचे चिन्ह ‘हत्ती’ आहे.
याशिवाय समाजवादी पक्षाच्या वहिदा शेख यांना ‘सायकल’, जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास गजरमल यांना ‘ऑटो रिक्षा’, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख यांना ‘खाट’, वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख यांना ‘गॅस सिलेंडर’, छाया जगदाळे यांना ‘शिट्टी’, हरेश डोळस यांना ‘चावी’, भाऊ अडागळे यांना ‘शिवणयंत्र’, मारुती पवार यांना ‘कपाट’ आणि ज्ञानेश्वर बो-हाटे यांना ‘तुतारी वाजविणारा माणूस’ असे चिन्ह मिळाले आहे. आता ही चिन्हे घराघरात पोहोचविण्यासाठी उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.
2009 ची विधानसभा निवडणूक माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष लढली होती. त्यावेळी देखील निवडणूक विभागाने लांडे यांना कपबशी हे चिन्ह दिले होते. यावेळी देखील त्यांना कपबशी हेच चिन्ह मिळाले आहे. लांडे यांना आता हे चिन्ह तारणार का?, अशी चर्चा भोसरीत सुरू आहे.