breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोंडवेवस्तीच्या शिवतीर्थ काॅलनीतील रस्त्याचे काम निकृष्ट, कनिष्ठ अभियंत्याला घेराव

पिंपरी ( महा ई न्यूज ) – वाल्हेकरवाडी येथील भोंडवे वस्तीतील शिवतीर्थ कॉलनीतील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र रस्ता स्वच्छ न करता, तसेच कमी प्रमाणात डांबर वापरून रस्त्याचे काम सुरू आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. संबंधित बहिरट ब्रदर्स या ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने या वेळी तक्रार करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर अरेरावी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ब प्रभागाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांना घेराव घातला.

वाल्हेकरवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे गेल्या दहा वर्षांपासून डांबरीकरण झाले नव्हते, अशा रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. रस्ता स्वच्छ करून त्यावर डांबर ओतून खडीकरण करणे आवश्यक असते. मात्र शिवतीर्थ कॉलनीत रस्ता स्वच्छ न करताच कमी प्रमाणात डांबराचा वापर करून डांबरीकरण केले जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली. त्यामुळे उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी या कामाची पाहणी केली. काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत त्यांनी काम बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर संबंधित ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिका-यांनी कामाची पाहणी केली. रस्त्याचे काम नव्याने करण्यात यावे, अशा सूचना कनिष्ठ अभियंता मोने यांनी केल्या.

शिवतीर्थ कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण नियमानुसार योग्य पद्धतीने करण्यात यावेत, अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे. संंबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत आहेत त्याबाबत ठेकेदाराच्या पर्यवेक्षकास सांगितले असता त्यांच्याकडून बेजबाबदारपणाची उत्तरे दिली जातात. त्यामुळे या कामाची नेमकी जबाबदारी कोणाची असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button