breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘भूसंपादन करताना यापुढे भरपाई देण्याच्या नियमाऐवजी ‘टीडीआरला’ प्राधान्य देणार

स्थायी समितीच्या सभेत ऐनवेळी ठरावा दिली मान्यता

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील विकास प्रकल्पासाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्यात येते. मात्र, यापुढे आरक्षित केलेल्या भूखंडाचा विकास करण्यासाठी जागा ताब्यात घेताना भरपाई देण्याच्या नियमाऐवजी ‘टीडीआरला’ (विकास हक्कांचे हस्तांतरण) प्राधान्य देण्यात यावे, असा ठराव स्थायी समितीच्या सभेत आयत्यावेळी पारित करण्यात आला आहे.

स्थायी समितीची आज (बुधवारी) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. स्थायी समितीने जागा ताब्यात घेताना भरपाई देण्याच्या नियमाऐवजी ‘टीडीआरला’ (विकास हक्कांचे हस्तांतरण) याला प्राधान्य देण्यात यावा असा ठराव पारित केला आहे. महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेतल्याच्या मोबदल्यात जागा मालकाला नुकसान भरपाई देण्यात येते. महापालिकेतर्फे विकास प्रकल्पासाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्याच्या नियमांचा गैरवापर सुरु आहे. असे प्रकार यापुढेही सुरु राहिल्यास महापालिकेच्या तिजोरीवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा भार पडेल.

महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होऊन शहरातील प्रामाणिक करदात्यांना मुलभूत सोई-सुविधा पुरविता येणार नाहीत. त्यामुळे विकास आराखड्यातील आरक्षित जागा नागरिक हिताच्या प्राधान्य क्रमाणे ताब्यात घ्यावी. जागेचा मोबदला टीडीआरच्या स्वरुपात देण्यात यावा. जेणेकरुन खासगी मालमत्ताधारक टीडीआर स्वीकारण्यास प्रवृत्त होतील. त्यांना योग्य मोबदला मिळण्यास मदत होईल, असे ठरावात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button