भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली मावळात शनिवारी आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/chandrakant-patil-4.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी दूध दरवाढ महाएल्गार आंदोलन मावळ तालुक्यातील नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दूध शीतकरण केंद्रावर करण्यात येणार आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी या बाबत माहिती दिली. शनिवारी (दि. १) सकाळी साडेसात वाजता हे आंदोलन होणार आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रतिकिलो ५० रुपये अनुदान, शासनाकडून ३० रुपये प्रतिलिटर दराने गायीच्या दुधाची खरेदी द्यावे, या मागण्यांकरिता हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
शासनाकडे मागणी केली आहे. परंतु, मागील दहा बारा दिवसांत शासन स्तरावर कुठलाही धोरणात्मक निर्णय होत नाही. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी या अंदोलनात सहभागी होणार आहेत.