भाजपसह राष्ट्रवादीचे नगरसेवक करणार ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन
![भाजपसह राष्ट्रवादीचे नगरसेवक करणार 'मनसे स्टाईल'ने आंदोलन](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/BJP-NCP.jpg)
निगडी भक्ती-शक्ती चाैकातील उड्डाणपुल वाहतूकीला खुला करा, आयुक्तांना पत्र
पिंपरी |महाईन्यूज|
निगडीच्या भक्ती-शक्ती चाैकात महापालिकेने उभारलेला उड्डाणपुल तत्काळ वाहतूकीस खुला करावा, अन्यथा भाजपसह राष्ट्रवादीचे नगरसेवक ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
याबाबत, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना भाजप नगरसेवक तथा क्रीडा सभापती उत्तम केंदळे, नगरसेविका कमल घोलप, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुमन पवळे यांनी दिलेल्या पत्रात ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करण्याचे म्हटले आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या भक्ती-शक्ती चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम दोन वर्ष झाले सुरु आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल. असं सांगण्यात येते. मात्र, अजूनही हे काम चालू आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
परंतू, भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे या दोन्ही मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे हे दोन्हीही मार्ग वाहतुकीला खुले करावेत, मात्र, उर्वरीत उड्डाणपुलाचे काम सुरु ठेवून लवकर पुर्ण करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे या दोन्ही मार्ग वाहतूकीला खुले न केल्यास भाजप, राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक, नगरसेविका ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) स्टाईलने हा रस्ता चालू करेल. असे म्हटले आहे.