भाजपच्या ‘या’ नगरसेवकाला प्रभाग समिती सभापती पदावर दुस-यांदा मिळाली संधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/142-3.jpg)
पिंपरी | महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग 27 रहाटणी-काळेवाडी भागातील भाजपचे नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची ग प्रभाग कार्यालय समितीच्या सभापती पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना भाजपने दोनवेळा सभापती पदावर काम करण्याची संधी दिली. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची हातोटी आणि सर्वांप्रती स्नेहभावना जपणारा नगरसेवक म्हणून त्यांची तळागाळात प्रतिमा असल्यामुळे भाजपने त्यांची दुस-यांदा निवड केली आहे.
बाबासाहेब त्रिभुवन यांचे रहाटणी भागातील काम कौतुकास्पद आहे. नागरिकांशी नाळ जोडलेला नगरसेवक म्हणून त्यांची प्रभागात ख्याती आहे. दैनंदीन जीवनात भेडसावणा-या समस्या सोडविण्याच्या बाबतीत नागरिकांचा त्यांच्याकडे सकारात्मक कल राहिलेला आहे. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर लागलीच संबंधीत विभागातील अधिका-यांशी संपर्क साधून पाठपुरावा करतात. जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत अधिकारी अथवा कर्मचा-यांना उसंत मिळत नाही. तेवढा सचोटीचा पाठपुरावा त्रिभुवन यांचा असतो. यामुळे नागरिकांच्या समस्या आगदीच कमी वेळेत सुटत असल्यामुळे नागरिकही त्यांच्याशी थेट संपर्क ठेवतात.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201010-WA0016.jpg)
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक असलेले नगरसेवक त्रिभुवन यांचे पक्षामध्ये देखील चांगले वलय आहे. त्यांची काम करण्याची पध्दत पाहून त्यांना यापूर्वी देखील ग प्रभाग समिती सभापती पदावर काम करण्याची संधी देण्यात आलेली आहे. या पदावर काम करण्याची त्यांची हातोटी पाहून पुन्हा पक्षाने त्यांच्यावर तीच जबाबदारी दिली आहे. त्यामुळे रहाटणी प्रभागातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.