breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भांडार विभागाच्या फर्निचर खरेदीत रिंग ?

  • दोन ठेकेदारांना काम वाटून दिल्याचा प्रकार

पिंपरी – महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या फर्निचर खरेदी करण्यात येत आहे. ही फर्निचर खरेदी भांडार विभागाकडून केली जात आहे. त्या फर्निचर खरेदीत ठेकेदारांनी संगनमताने रिंग केल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय विभागातील नऊ साहित्य प्रकारात तीन ठेकेदार पात्र ठरले असताना दोन ठेकेदारांनाच काम वाटून दिले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्यवर्ती भांडार विभागाकडून वैद्यकीय विभागासाठी नऊ प्रकारच्या फर्निचर साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यता आली. त्यामध्ये 3 निविदाधारकांच्या निविदा पात्र ठरल्या होत्या. त्यांच्यापैकी मे. रेखा इंजिनियरिंग वर्क्स व मे. निर्मिती इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन या दोन ठेकेदारांना हे काम विभागून देण्यात आले. त्यामध्ये नऊ प्रकारचे फर्निचर साहित्यामध्ये 31 लाख 7 हजार 920 रुपयांची खरेदी मे. रेखा इंजिनियरिंग वर्क्स या ठेकेदाराकडून केली जाणार आहे. तर, मे. निर्मिती इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन 31 लाख 37 हजार 937 रुपयांची फर्निचर घेण्यात येणार आहे.

मध्यवर्ती भांडार विभाग एकुण 67 लाख 97 हजार 660 रुपयांची फर्निचर साहित्य खरेदी करणार आहे. तसा प्रस्ताव बुधवारी (दि.3) होणा-या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आहे. मात्र, या निविदाप्रक्रियेत तिन निविदा असताना दोन ठेकेदारांमध्ये ठरवून हे काम विभागून देण्यात आले. त्यामुळे खरेदीत रिंग झाल्याचे समोर येत आहे. त्यावर स्थायी समिती हा विषय मंजुर की चाैकशी लागणार हे पाहावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button