breaking-newsपिंपरी / चिंचवड

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा तिव्र आंदोलन करू – पिंपरी युवा सेनेचा इशारा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

फुगेवाडी, दापोडी आणि बोपखेल भागात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी पिंपरी युवा सेनेच्या वतीने केली आहे.

यासंदर्भात युवासेनेने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी डॉ. दगडे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, फुगेवाडी, दापोडी आणि बोपखेल परिसरामध्ये भटक्या व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. नागरिकांवरती हल्ला करणे, गाडयांचा पिच्छा करणे, चावा घेणे इत्यादी प्रकार घडत आहेत. विशेषकरून लहान मुलांना या कुत्र्यांचा धोका तयार झाला आहे. मोटार सायकल चालवणारे, सायकल चालवणारे व सकाळी जॉगिंगला जाणाऱ्या नागरिकांवर तसेच शाळेत जाणाऱ्या लहान मुलांवर भटकी कुत्री हल्ला करत आहेत. कुत्रा चावल्यास घ्यायला लागणाऱ्या लसीचा तुटवडा असल्यामुळे व अत्यंत महागडी औषधे असल्यामुळे नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.

फुगेवाडी-दापोडी परिसरातील भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पिंपरी युवासेनेने दिला आहे. यावेळी युवतीअधिकारी प्रतीक्षा घुले, विभागसंघटक निलेश हाके, शाखाप्रमुख प्रमोद शिंदे, मनोज काची, टोनी मकासरे, सुनील कदम, बाबू पाटील आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button