breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-याला कडक शासन करा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भगवान बाबाच्या मुर्तीची विटंबना केल्याने भगवान बाबा प्रतिष्ठान, जय भगवान युवा फाऊंडेशन, ओबीसी संघर्ष समिती, भगवान सेना, भगवान बाबा युवा मंच, जय भगवान महासंघ, भगवान बाबा मित्र मंडळ, ब्रम्हचैतन्य फाऊंडेशन, लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती कृती समिती, मराठावाडा जन विकास मंच, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, गोपीनाथ मुंडे फाऊंडेशन आदी संघटनांच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध करण्यात आला.

विजया दशमीच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील भगवान बाबा गडावर लाखोंच्या जनसमुदाय नतमस्तक होण्यासाठी जमतो. भगवान बाबा हे वंजारी समाजाचे दैवत आहे. भगवान बाबांचे विचार आचरणात आणणारे कोट्यावधी अनुयायी देशभर आहेत. मानवतेची, समानतेची, एकता व अखंडतेची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या मुर्तीची विटंबना अहमदनगर जिल्ह्यातील स्वप्निल शिंदे या समाजकंटकाने दोन दिवसांपुर्वी केली.

या घटनेतील आरोपीला कडक शिक्षा द्यावी या मागणीसाठी बुधवारी (दि. 16 जानेवारी) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात उद्योजक आबासाहेब नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. निदर्शनानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भगवान बाबा प्रतिष्ठान, जय भगवान युवा फाऊंडेशन, ओबीसी संघर्ष समिती, भगवान सेना, भगवान बाबा युवा मंच, जय भगवान महासंघ, भगवान बाबा मित्र मंडळ, ब्रम्हचैतन्य फाऊंडेशन, लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती कृती समिती पिंपरी चिंचवड, मराठावाडा जन विकास मंच, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, गोपीनाथ मुंडे फाऊंडेशन आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button