Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
भंगार गोदामातील केमिकलचे रिकामे आणि भरलेल्या ड्रममुळे आग भडकली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/IMG-20200322-WA0011.jpg)
पिंपरी – शहरात रविवारी दुपारी चिखलीत भंगाराच्या गोदामाला आग लागण्याची घटना घडली. देहू आळंदी रोडवरील हरगुडे वस्ती, चिखली येथे घडली.
देहू आळंदी रस्त्यावरील हरगुडे वस्ती, चिखली या ठिकाणीही आग लागल्याची वर्दी अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार सात बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. भंगाराच्या गोदामातील केमिकलचे रिकामे आणि भरलेल्या ड्रममुळे ही आग भडकली आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे.