breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बालगंधर्व रंगमंदिरात ‘पिफ’चे आज होणार उद्घाटन

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

१८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास आज (गुरुवार) पासून सुरूवात होत आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता ‘पिफ’चा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

‘पिफ’च्या उद्घाटन सोहळ्यात ‘सीआयडी’ सारख्या हिंदी मालिकांचे दिग्दर्शक बी. पी. सिंग आणि अभिनेते विक्रम गोखले यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अ‍ॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीच्या ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अ‍ँड साउंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबरोबरच सीआयडी या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्याबरोबर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे व अभिनेता सुबोध भावे यांची खास उपस्थिती असणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button