बाबासाहेबांच्या विचारांचं, शिकवणींचं पालन करुन घरातच जयंती साजरी करुया – सिमा सावळे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/IMG-20200414-WA0017.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगरसेविका सावळे यांनी पिंपरी – चिंचवड शहरातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेबांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचं, शिकवणींचं पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण आज, घरातच थांबून डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करुया, त्यांना अभिवादन करुया. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया. कोरोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून ३० एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे.
सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा असे असे आवाहनही मा. स्थायी समिती अध्यक्षा नगरसेविका सिमा सावळे यांनी केले आहे. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन नगरसेविका सिमा सावळे यांनी केले आहे.