‘बाप्पा’ कोरोनाचे संकट लवकर दूर होवू दे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/FB_IMG_1598696103423.jpg)
‘महाईन्यूज’ कार्यालयातील पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे केले काैतूक
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या महामारीत आपणाला अत्यंत साध्या पध्दतीने आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा लागत आहे. गणेशोत्सवात आपल्या सर्वांच्या आनंदावर विरजन पडले आहे. त्यामुळे बाप्पा… श्री गणेशा हे कोरोनाचे संकट लवकर दूर होवू दे, असं साकडं महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी घातलं आहे. यावेळी त्यांनी महाईन्यूज कार्यालयातील पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे काैतूक केले. याप्रसंगी अधिक दिवे-पाटील, विकास शिंदे, अमोल शित्रे, स्वयंम अस्वार, नागेश सोनूले आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ”महाईन्यूज”ने घेतला. त्यानुसार तुरटीपासून बनविलेली पर्यावरणपूरक गणेश मुर्ती कार्यालयात बसविली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांना गणरायांची आरती करण्याचा मान दिला जात आहे. आज आरती करण्याचा मान पक्षनेते नामदेव ढाके यांना देण्यात आला.
ढाके म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे संकट अधिक गडद होवू लागले आहे. दररोज शेकडो रुग्णाची संख्या वाढत चालली आहे. प्रत्येक रुग्णांना महापालिका रुग्णालयाच्या माध्यमातून योग्य निदान केले जात आहे. सध्यस्थिती आण्णासाहेब मगर स्टेडियमवरील जम्बो कोविड सेंटर, आॅटो क्लस्टरचे आयसीयू व व्हेटींलेटर कोविड सेंटर, वायसीएम रुग्णालय यासह अन्य कोविड सेंटरच्या माध्यमातून औषधोपचार सुरु आहे. खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णांची होणारी लूटमार देखील थांबवण्यात यश मिळाले आहे. त्या रुग्णालयातील रुग्णांच्या बिलाचे आॅडीट सुरु असून जादा आकारण्यात आलेली बिले परत करण्यात येत आहेत.
तसेच गणेशोत्सव काळात शहरातील विर्सजन घाटावर जाण्यास मनाई आहे. नागरिकांनी गणेश मुर्ती पालिका संकलन केंद्र, स्वयंसेवी संस्था अथवा स्थानिक नगरसेवकांच्या मुर्तीदान रथाकडे देण्यात यावी, जेणेकरुन कोरोना संकट रोखून आपल्याला श्री गणेशाचे योग्य विर्सजन करता येईल. आपल्या सर्वाचे आरोग्य देखील सुरक्षित राहण्यात मदत होईल. असेही ढाके यांनी सांगितले.