breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बांधकाम मजुराचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर धडक मोर्चा

  • बांधकाम मजुरांची नोंदणी करण्याची मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – बांधकाम मजुरांच्या विविध मागण्यांसाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महापालिका अतिरिक आयुक्त, पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, लालचंद पवार, प्रीती रोडे, भीमाशंकर शिंदे, मलिक शेख, लक्ष्मण शिंगाडे, नाना कांबळे आदी उपस्थित होते

बांधकाम मजुरांसाठी महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम 1996 चे कलम 12 (2) व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियम व सेवाशर्ती) नियम 2007 मधील नियम 46 प्रमाणे बांधकाम मजुरांची नोंदणी करण्याचे अधिकार महानगर पालिका वार्ड अधिकारी यांना देण्यात आले आहेत, परंतु प्रत्यक्षात महानगरपालिकेत नोंदणी आणि रिणीवल आदी कोणतेच काम केली जात नाही. याबाबतची माहिती नाही असे म्हणून अधिकारी हात झटकत आहेत.

बाबा कांबळे म्हणाले की, बांधकाम मंजूर शासनाच्या योजनेपासुन वंचित राहत आहेत. त्यांची नोंदणी नसल्याने कोणतेही लाभ दिले जात नाही. ज्याची नोंदणी झाली, अशा बांधकाम मजुरांना रिणीवल करण्याच्या नावाखाली वेगवेगळे कागदपत्र मागुन त्यांची अडवणुक केली जात आहे. कामगार कार्यालय आणि बांधकाम मंडळाच्या या कारभारामुळे गोरगरीब कष्टकऱ्यांचे जीव धोक्यात जात आहेत. अनेकांनी आपला प्राण गमवला आहे. अनेक ठिकाणी अपघातात बांधकाम मजुरांचे प्राण गमवावे लागत आहेत.

पुण्यात दोन घटनांत 25 बांधकाम मजुरांचा मुत्यु झाला असुन, पिंपरी चिंचवडमध्ये शासनाचा  प्रकल्प असलेल्या म्हाडाच्या साईटवर अपघात एका मजुरांचा मुत्यु झाला. दोन मजुर गंभीर जखमी आहेत. या मुख्य मालकांवर (बिल्डर ) गुन्हा दाखल करण्याऐवजी ठेकेदारावर गुन्हा दाखल करून मुख्यमालक आणि म्हाडा अधिकारी यांना वाचवलं जात आहे. कामगार विभागाने तर कोणतीच कारवाही केलेली नाही.

वाकड येथील एका साईटवर 18 जूलैला अपघातात होवून गुन्हा दाखल नाही. हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशा प्रकारे बांधकाम मजुरांच्या जीवनाशी खेळ सुरू आहे. या सर्व प्रश्नासाठी पिंपरीमध्ये मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.

त्यामुळे विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चाैक पिंपरी ते महानगरपालिका गेटपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, कामगार अधिकारी, चंद्रकांत इंदलकर आणि पोलीस आयुक्तांना बांधकाम कामगारांच्या मागण्याचे निवेदन दिले आहे.

या आहेत बांधकाम मजुराच्या मागण्या…

पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम मजुरांची महानगरपालिकेच्या वार्ड ऑफिसमध्ये नोंदणी आणि रिणीवलचे कामकाज सुरु करावे

म्हाडा आणि इतर साईटवर झालेल्या अपघात मुख्य मालक(बिल्डर) आणि म्हाडा अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे मुत्युच्या नातेवाईकांना नुसकान भरपाई मिळावी.

नोंदणी झालेल्या बांधकाम मजुरांना कल्याणकारी योजनेचे लाभ देण्यात यावेत. मंडळाच्या वतीने 4 लाख कामगाराना घनबुट, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट ,जाळी सह सुरक्षा साधने देण्यात आली (परंतु प्रत्येक्ष मात्र एकाही बांधकाम मजुराकडे सुरक्षा साधन नाहीत हे ज्याज्या ठिकाणी अपघात झाले त्या ठिकाणी कामगारांच्या अंगावर वरील साधन नव्हतेच हे सिद्ध झाले आहे ) मग वाटप केलेल्या सुरक्षा साधन गेले कुठे यांची चैकशी करावी.

पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र बांधकाम कल्यानं मंडळ चे कार्यालय सुरु करावे बांधकाम मजुरांची नोंदणी आणि लाभ देण्याची ऑनलाईन पद्धत सुरु करावी .

पिंपरी चिंचवड शहरातील धोकेदायक बांधकामाची यादी करून अपघात होण्यापूर्वीच आशा कामावर बंदी घालुन स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये संबधित बिल्डर विरोधात कादेशीर कारवाई करावी .

नोंदणी नसताना बांधकाम साईटवर अपघात झाल्यास त्यांच्या वारसदारास अपघाती मुत्यु प्रमाणे लाभ देण्यात यावेत.

पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम कामगाराच्या नाक्यावर निवारा शेड पाणी,टॉयलेट सह इतर विविध उपयोजना करण्यात याव्यात ,

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button