breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बांधकाम कामगारांना सुरक्षा साधनाचे वाटप

–  कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चिंचवडमधील मेळाव्यात वाटप
पिंपरी ( महा ई न्यूज ) – कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे घेण्यात आलेल्या असंघटीत कामगार मेळाव्यात पिंपरी चिंचवड शहर आणि उपनगरातील बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, सामाजिक कार्यकर्ते नाना कसबे, चंद्रकांत कुंभार, महिला उपाध्यक्षा ज्योती कदम, धर्मेंद्र पवार, भास्कर राठोड, शेषराव गायकवाड, रज्जक सय्यद, नसिमा पठाण, रुक्मिणी थोरात, रेखा उकिरड़े, रेशमा देवकर, महाविर कांबळे, सुमित्रा राठोड, मुक्ता पवार, संजीवनी सरावदे, लालू राठोड, मंजूळा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कामगारांना वाटप केलेल्या साधनामध्ये मोठी स्टील पेटी, हेल्मेट, हातमोजे, सेफटी  बेल्ट, पाणी डबा, जेवणाचा डबा, चटई, बैटरी, मास्क, पिशवी, मच्छर दाणी, इअर प्लग याचा सामावेश आहे.
यावेळी नखाते म्हणाले की ”  शहरातील विविध भागातील मोठ-मोठ्या आस्थापना, बांधकाम साईटवर काम करणारे सर्वच प्रकारचे कामगारांकडे सुरक्षित साधने उपलब्ध नाहीत. कामगारांनी कामाच्या ठिकाणचे मालक व पर्यवेक्षक यांचेकडे  स्वता:ची सुरक्षा आणि कायद्यानुसार नोंदणी या दोन महत्वाच्या बाबींचा आग्रह धरावा. तसेच यापूर्वी व आता महामंडळाकडून मिळालेल्या  या सर्व साधने टाळाटाळ न करता, घरी ना ठेवता सुरक्षा सधानांचा वापर करणे गरजचे आहे. अन्यथा मोठ्या अपघातातून हानी होऊन, प्रसंगी प्राण जाऊ शकतो यासाठी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी त्यानी घ्यावी.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळच्या माध्यमातून  विविध लाभ देण्यात येत आहेत, दोन वर्षापासुन महासंघाचे माध्यमातून अनेकवेळा  विशेष अभियांन राबवून मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आले. यासाठी राज्याचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, ओंमप्रकाश यादव, आमदार महेशदादा लांडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.  प्रस्तावना बालाजी इंगळे यानी केले. सुत्रसंचालन किशोर कदम यानी केले. तर वंदना थोरात यानी आभार मानले.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button