बनावट नोट असल्याचे सांगत वृध्देस लुटले
पिंपरी – एक लाखाच्या कर्जाची रक्कम बँकेत मोजत असताना अचानक आलेल्या दोन अज्ञात तरूणांनी ज्येष्ठ महिलेकडून हातचलाखीने ४६ हजार लांबवले. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात दोन अज्ञात तरूणांना विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आशा रंजन भांबळ ( वय ५८, रा. रानवडे वाडा, औंधगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. भांबळ यांच्या पतीची पेंशन देहूरोड येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत आहे. त्यांच्या मुलीसाठी या पेंशनच्या खात्यावर एक लाखाचे कर्ज भांबळ यांनी घेतले होते. १३ तारखेला कर्जाची एक लाखाची रक्कम त्यांनी बँकेतून काढली. व दोन हजारांच्या नोटांचे बंडल त्या मोजत होत्या. यावेळी तेथे आलेल्या दोघ अज्ञातांनी या बंडलात दोन नोटा नकली असल्याचे सांगुन त्यांना भ्रमीत केले. आणि हातचलाखीने यातील ४६ हजार रूपये लांबवले. हा प्रकार बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी आज देहूरोङ पाोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.