फ क्षेत्रीय कार्यक्षेत्रात गुरुवारी पाणी पुरवठा बंद
![Water supply to entire Pune city was cut off on Thursday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/no-water-715x400.jpg)
पिंपरी – आकुर्डी येथे नव्याने अंथरण्यात आलेल्या 600 मिली मीटर जलवाहिनीचे कनेक्शन येत्या गुरुवारी (दि.19) देण्यात येणार आहे. त्यामुळे ‘फ’ क्षेत्रीय परिसरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, असे पाणी पुरवठा विभागाने पत्रक काढले आहे.
सेक्टर क्रमांक 23 जलशुध्दीकरण केंद्र ते कृष्णानगर संप येथे जाणा-या 1200 मिली मीटर व्यासाच्या पंपिंग मृद लोह जलवाहिनीस भक्ती-शक्ती चौक, खंडोबामाळ, आकुर्डी येथे नव्याने अंथरण्यात आलेल्या 600 मिली मीटर जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. तसेच सेक्टर क्रमांक 22, निगडी, तळवडे, मोरेवस्ती, यमुनानगर, म्हेत्रेवस्ती, चिखली, जाधववाडी, शाहुनगर, संभाजीनगर, त्रिवेणीनगर, काळभोरनगर, एश्वर्यम सोसायटी, चिंचवड स्टेशन, दवाबाझार, अण्णासाहेब मगर झोपडपट्टी, अजंठानगर, विद्यानगर(अशंत:), अजमेरा, म्हाडा कॉलनी, मोरवाडी व लालटोपीनगर इत्यादी भागात गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारी (दि.20) कमी वेळ व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन, पाणीपुरवठा विभागाने केले आहे.