breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फेरीवाल्यांची प्रशासनाच्या विरोधात अस्तित्वाची लढाई; पालिकेवर मोठ्या संख्येने मोर्चा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात अधिपासुन व स्थापनेपासून फेरीवाला अस्तित्वात आहे, फेरीवाला कायदा झाला आहे, ही समाधानाची बाब असली तरी शहरात व्यवसाय करणारे हातगाडी, टपरी, स्टॉल धारकांना जोपर्यंत कायद्यानुसार लाभ मिळत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार करत विविध मागन्यांसाठी फेरीवाल्यानी आज शुक्रवारी (दि. 26) महापालिका भवनावर मोर्चा काढला.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात प्रदेश संघटक अनिल बारवकर,कार्याध्यक्ष इरफान चौधरी, उपाध्यक्ष साईनाथ खंडीजोड़, मनपा समिती सदस्य राजेन्द्र वाघचौरे, मनीषा राउत, अरुणा सुतार,समाधान जावळे बिलाल तांबोळी, सुरेश देड़े, वासुदेव मनुरकर, सय्यद अली, राजेन्द्र जाधव, आयविन फर्नांडिस, फातिमा शेख, नसीमा तंबोळी, खातेजा राजनाळ, सुलोचना मिरपगारे, सरिता वठोरे, नंदा तेलगोटे, अरुण मेहर, पुष्पा सूर्यवंशी, अनिल सुर्यवंशी आदींसह विविध भागातील हातगाड़ी, टपरीधारक उपस्थित होते.

हातगाडी, टपरीधारकांनी घोषणा देत मनपा भवनासमोर आंदोलन केले. यावेळी  बारवकर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून फेरीवाला कायद्याची अमंलबजावणी न करताच कायदा धाब्यावर बसवून शहरातील फेरिवाल्यांवर कारवाई केली जात आहे. फेरीवाले कायदा अस्तित्वात असताना जीव मुठीत घेउन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मनीषा राउत म्हणल्या की, शहरात हॉकर्स झोन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तरी देखील कार्यवाही होत नाही.

शहर फेरीवाला समितीची बैठक घ्यावी, फेरीवाल्या वरील अन्यायकारक कारवाई थांबवावी, भक्ति-शक्ती शिल्प पर्यटन स्थळाजवळ हॉकर्स झोन करावा, अन्यायकारक दंड रद्द करावा आदी मागण्यांचे निवेदन सह शहर अभियंता राजन पाटिल यांना देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button