प्लास्टीक पिशव्यांचा वापरणा-याकडून एक लाखाचा दंड वसूल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/26-27.jpg)
पिंपरी – महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विविध भागांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानांवर बुधवारी (दि.५) कारवाई करण्यात आली. एका दिवसात तब्बल १ लाख ५ हाजारांच्या दंड वसूल करण्यात आला. तसेच, अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना एकूण २६ हजार १८० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेतर्फे ही मोहिम राबविण्यात आली. शहरातील वेगवेगळया भागांत स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्येकर्त आणि स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. या वेळी कचरा न जाळण्याचे आवाहन करण्यात आले. प्लास्टिक बंदीअंतर्गत शहरातील एकूण २२० दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९ दुकानदारांकडून १ लाख ५ हजारांच्या दंड वसूल करण्यात आला.
त्यामध्ये एम्पायर इस्टेट, चिंचवड येथील सराफी दुकान, थेरगाव येथील जतिम महाराज ट्रेडर्स यांच्याकडे दुसNयांदा प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्याने त्यांना प्रत्येकी १० हजारांच्या दंड करण्यात आला. तसेच, प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे आणि कचरा टाकून अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांकडून २६ हजार १८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत सर्व क्षेत्रीय अधिकारी, सहायक आरोग्यधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते.