breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘प्लाझ्मा’ दान करणा-याला युवक कॉंग्रेसकडून मिळणार ‘जीवनदाता प्रोत्साहन निधी’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी अंत्यत प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा उपचार पध्दतीद्वारे आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान करण्या-या जीवनदात्यांसाठी पिंपरी-चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसकडून प्रत्येकी १ हजार रुपये जीवनदाता प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.

हे अभियान ९ आगस्ट पासून म्हणजेच भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिन व क्रांती दिन यांचे औचित्य साधत हा जीवनदाता प्रोत्साहन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबात अधिक माहिती देताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले, “अभूतपूर्व अशा या भयानक व जीवघेण्या आजाराने आज वर जगभरात लाखो बळी घेतले आहेत. दिवसेंदिवस हा आजार हाहाःकार माजवत आहे. यावर उपाय म्हणून गेल्या ८ महिन्यांपासून अजून तरी निश्चित औषध उपलब्ध झाले नाही. मात्र, सध्या प्लाझ्मा थेरपी ने मोठ्या प्रमाणात उपचारांना यश मिळत आहे. जीवित हाणी टाळण्यास ती अंत्यत प्रभावी ठरत आहे.

यासाठी कोरोनामधून ब-या झालेल्या रूग्णांनाच आपला प्लाझ्मा दान करून ईतर रूग्णांचे प्राण वाचविता येत आहेत. अधिकाधिक रूग्णांचे प्राण वाचले जावेत. यासाठी ब-या झालेल्या रूग्णांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने प्रत्येक जीवनदात्यास 1 हजार रुपये प्रोत्साहन निधी देणार आहोत. उपाचारानंतर बरे झालेल्या नागरिकांनी ईतर नागरिकांसाठी पुढे यावे. प्लाझ्मा दान करावा व प्रोत्साहन निधीसाठी मोबाईल क्रमांकावर (९८६०१७७१७७, ८४८४०८३७३७) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे

याबाबत युवक काँग्रेसने पिंपरी-चिचंवड महानगरपालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती कळविण्यात आली आहे, अशी माहिती शहराध्यक्ष बनसोडे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button