Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी पतीकडून पत्नीचा अमानूष छळ
![Hinjadi women rape by her Tinder friend](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/0crime_wome_57.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मिळकत नावावर करून देण्यासाठी पतीने पत्नाचा अमानूष छळ केल्याची घटना चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी शाम रामदास सावंत (रा. वंदे मातरम सोसायटी, रुपीनगर, तळवडे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पत्नी सुषमा शाम सावंत (वय 35, रा. अंजनी गाधा सोसायटी, सी विंग फ्लॅट नंबर 404, देहू-आळंदी रोड, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती शाम सावंत यांनी मिळकत स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पत्नीचा छळ केला. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून शारिरीक आणि मानसिक त्रास दिला. तुझे नावावरील सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर करून दे, असे म्हणून फिर्यादीचे अंगावर धावून जाऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार सुषमा यांनी केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.