प्राधिकरण प्रशासन : अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
![Pimpri Chinchwad Navnagar Development Authority merger notification issued!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/PCNTDA.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्राधिकरणाने नव्याने प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. 31 डिसेंबर 2015 पूर्वी बांधलेल्या अनधिकृत किंवा अतिक्रमणीत मिळकत धारकांना 19 फेब्रुवारी 2019 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाने 31 डिसेंबर 2015 पूर्वीची अनधिकृत बंधकामे नियमित करण्याचा शासन निर्णय 7 ऑक्टोबर 2017 रोजी पारित करण्यात आला होता. तेव्हा नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने आपल्या हद्दीतील अनधिकृत मिळकत धारकांना ती बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी 15 मे 2018 पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर आता प्राधिकरणाने 20 फेब्रुवारी 2018 रोजी प्रसिध्द झालेल्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार पुन्हा एकदा आवाहन केले आहे. 31 डिसेंबर 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्राधिकरणाच्या हद्दीतील मिळकत धारकांनी पुन्हा अर्ज करावयाचे आहेत. त्यासाठी 18 फेब्रुवारी 2019 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज करण्याकरिता ज्या माहितीची आवश्यकता आहे, ती संपूर्ण माहिती प्राधिकरणाच्या www.pcntda.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी, नागरिकांनी लायसन्स किंवा आर्किटेक्टमार्फत मुदतीत अर्ज करावेत. मुदतबाह्य अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन प्राधिकरण प्रशासनाने केले आहे.