प्रवेश नाकारणा-या जय हिंद शाळेला रोचीरमनींनी शिकविला “धडा”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Untitled-1-copy-3.jpg)
पिंपरी – पिंपरीतील जय हिंद शाळेने ज्युनियर केजीतील एका विद्यार्थ्याला नापास करून त्याचा शाळेचा दाखला काढून नेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांवर दबाव वाढवला होता. त्यावर विद्यार्थ्याचे पालक आणि विद्यार्थी अशा तिघांनी शाळेच्या समोरच उपोषण सुरू केले. अखेर राजेश रोचीरमानी यांच्या मुलाला सोमवारपासून (दि. 10) शाळेत येण्यास सांगितले आहे.
पिंपरीत राहणाऱ्या राजेश रोचीरमानी यांनी आपल्या मुलाला घेऊन संपूर्ण कुटुंबासोबत शाळेसमोरच उपोषण सुरू केले होते. मुख्याध्यापिका त्यांच्या मुलाला शाळेत येऊ देत नसल्याने उपोषण करण्यात आले होते. मात्र, आज शनिवारी (दि ८) जयहिंद शाळेच्या प्रशासनाने रोचीरमानी यांच्या मुलाला सोमवारपासून शाळेत येण्यास सांगितले. त्यानंतर रोचीरमानी आणि त्यांची पत्नी आणि मुलगा यांनी उपोषण मागे घेतले.
रोचीरमानी आणि त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शाळेचा दाखला काढून घेऊन जावा, यासाठी मुख्याध्यापिका व्ही. राजमाता राजेश रोचीरमानी या पालकास दबाव टाकत आहेत. या दबावाला न जुमानता रोचीरमानी यांनी आपल्या मुलाचा शाळेतून दाखला काढून घेतला नाही, म्हणून त्यांना संपूर्ण कुटुंबासोबत उपोषण करावे लागले. अखेर त्या मुलाला न्याय मिळाल्याने पिंपरीतील इतर पालकांमध्ये उत्साह वाढला आहे.