breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रवीण आष्टीकरांवर आयुक्तांची मेहेरबानी – नगरसेवक राजू मिसाळ

आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई न केल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अाष्टीकर यांचा मनमानी कारभार सुरु आहे. त्या जागी अन्य अधिका-यांची बदली होवूनही त्याचे पदावतन केलेले नाही. तसेच त्याच्याबाबत तक्रारी असतानाही आयुक्त श्रावण हर्डीकर हे पाठिशी घालत आहेत. येत्या आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई न केल्यास आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक राजू मिसाळ यांनी दिला. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या. 

महापालिकेच्या स्थायी समिती आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत एकूण 46 विषय ठेवले होते. त्यातील 3, 35, 44 हे विषय तहकूब तर 22 विषय प्रशासनाने मागे घेतला आहे.  एकूण 29 कोटी 54 लाख 28 हजार रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली.

राजू मिसाळ म्हणाले की, नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची 29 सप्टेंबर 2018 रोजी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांना नांदेड येथून कार्यमुक्त देखील करण्यात आले. येथून नगरविकास विभागाकडे पाकीटे पाठविल्यामुळे त्यांना महापालिकेत येऊ दिले जात नाही, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.

त्यांच्याकडून वारंवार भांडार विभागाचा पदभार काढून घेण्याची मागणी केली. आयुक्त हे त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करित आहेत. महापालिकेत स्थानिक अधिकारी सक्षम असताना प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांना मेहेरबानी दाखविली जात आहेत. स्थानिक अधिका-यांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे प्रवीण अाष्टीकर यांचा भांडार विभाग काढून घ्यावा, अशीही मागणी मिसाळ यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button