breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्रभाग 23 (थेरगाव)ची कचराकुंडी मुक्त प्रभागाकडे वाटचाल

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रभाग क्रमांक 23 (थेरगाव)ची कचराकुंडी विरहीत प्रभागाकडे वाटचाल सुरू आहे. संपूर्ण शहरात कच-याची समस्या गंभीर बनत चालली असताना थेरगाव प्रभागात वेळेत गाड्या पोहोचत असून घरोघरचा कचरा व्यवस्थितरित्या उचलला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आरक्षीत जागेतील घरे नागरिकांच्या नावावर करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. तरी, ही बांधकामे नियमीत होण्याचा तिढा कायम असला केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानबाबत येथील नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवली आहे. घरोघरचा कचरा व्यवस्थितरित्या गोळा केला जात आहे. कचरा गाडी घरासमोर येताच दररोजचा कचरा गाडीत टाकला जातो. नियमितपणे कचरा गाड्या येत असल्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांची होणारी गैरसोय टळली आहे.

कैलासनगर येथील कोप-यावर गेल्या कित्येक वर्षांपासून असणारी कचरा कुंडी कायमची हटविण्यात आली आहे. कचरा कुंडी हटविल्यानंतरही काही नागरिक त्याठिकाणी कचरा टाकत होते. शेवटी नगरसेवक कैलास बारणे यांनी स्वतः त्याठिकाणी मध्यरात्रीपर्यंत थांबून कचरा टाकणा-या नागरिकांना मार्गदर्शक सूचना केल्या. त्यांचे मनोधैर्य बदलण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक बारणे यांच्या सूचनेचा मान राखून नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतली. आज त्याच ठिकाणी पेव्हींग ब्लॉक टाकून त्यावर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे ठेवले आहेत. प्रभागातील काळेवाडी फाटा ते तापकीरनगर बीआरटीलगत रहाटणी फाटा याठिकाणची एक कचरा कुंडी सोडली तर संपूर्ण प्रभाग कचरा कुंडी विरहीत प्रभाग होत आहे. नगरसेवक कैलास बारणे यांनी प्रभागात स्वच्छतेला पहिले प्रधान्य दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button