breaking-newsपिंपरी / चिंचवडमुंबई

प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाच्या महासचिव पदी अशोक जयनारायण मंगल ह्यांची निवड

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीअंतर्गत पर्यावरण विभागाचे महासचिव म्हणून अशोक जयनारायण मंगल ह्यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस पर्यावरण विभागाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथील गांधी भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे ह्यांच्या हस्ते अशोक मंगल ह्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

अशोक मंगल गेल्या ३६ वर्षांपासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीत वेगवेगळ्या अध्यक्ष्यांच्या मागदर्शनाखाली विविध पदावर काम केले आहे. वॉर्ड अध्यक्षापासून शहर जिल्हा महासचिव आणि ग्राहक स्वरंक्षण मंचाचे अध्यक्षाच्या रूपाने जबाबदारी सांभाळली. प्रथम अध्यक्ष दिवंगत टी ए तिरुमणी, सुरेश सोनावणे, भाऊसाहेब भोईर ह्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य केले तसेच १९९५ पासून दिवंगत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे प्रथम अध्यक्ष दिवंगत सतीश अगरवाल ह्यांच्या कमिटीत कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिले. तसेच राज्य स्तरावर सेवादल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा ह्यांच्या नेतृत्वाखाली संघटन मंत्री आणि प्रदेश संघटक म्हणून २० वर्ष काम केले. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button