प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा; अभिनव उपक्रम
![‘Diwali Padwa’ one of the three and a half moments today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/diwali_5_1899441_835x547-m.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलच्या वतीने प्रदूषणमुक्त दिवाळी सण साजरी करावी, यासाठी समाजप्रबोधन करीत आहे.
यंदा करोना संसर्गजन्य संकटाच्या पार्श्वभूमीवर कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयाचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना (प्रांत 3234 डी 2) लायन्स क्लब ऑफ तळेगावच्या अध्यक्षा प्रमिला वाळुंज, अभय शास्त्री, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पिंपरी-चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या बैठकीत महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांकडून दिवाळी सणानिमित्त फटाके न उडविण्याचे प्रतिज्ञापत्र ऑनलाइन एक लाख गुगल फॉर्मद्वारे भरण्याचा संकल्प राबविण्यात येणार असल्याचे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा यांनी यावेळी सांगितले.