पोलिसांना आव्हान : पिंपरीत १०० जणांच्या टोळक्याचा धुडगूस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/imeg-2-300x225-1.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरीतील नेहरूनगर येथे सुमारे १०० जणांच्या टोळक्याने राडा केला आहे. सर्व आरोपींच्या हातामध्ये तलवार ,कोयते ,लाकडी दांडके,बॅट ,चॉपर ,सिमेंटचे ब्लॉक ,दगड विटा होत्या .त्यांनी तरूणावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी ( दि .३० ) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली .
नीलेश सुभाष जाधव ( वय ३५ , रा . नेहरूनगर , पिंपरी )असे प्राणघातक हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
आशिष जगधने ( वय ३१ ) , इरफान शेख ( वय ३० ) , जितेश मंजुळे ( वय २८ ) , जावेद औटी ( वय २९ ) , आकाश हजारे ( वय ३० ) व त्यांचे इतर ९५ साथीदार ( नाव , पत्ता माहिती नाही ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी जाधव हे यांचे नेहरूनगर येथे कार्यालय आहे . शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी हे ऑफिसमोर पार्क केलेल्या कारमध्ये लॅपटॉप ठेवण्यासाठी गेले . त्यावेळी सुमारे १०० जण कार आणि दुचाकीवरून डबल ट्रिपल सीट आले . सर्व आरोपींच्या हातामध्ये तलवार , कोयते , लाकडी दांडके , बॅट , चॉपर , सिमेंटचे ब्लॉक , दगड , विटा होत्या .
एकाने निलेश जाधव यांच्याकडे बोट दाखवून ‘ हा होता का ‘ अशी विचारणा केली . याला आपण जिवंत सोडायचे नाही . याला संपवून टाकू ‘ असर म्हणत एकाने तलवारीने निलेश यांच्या पाठीवर वार केला . त्यानंतर आरोपींनी निलेश यांना पळवून मारहाण केली . कोणाच्यात दम असेल तर बाहेर या ‘ असे म्हणत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली . तसेच काही वाहनांची तोडफोड करून नुकसान केले . घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , उपायुक्त , गुन्हे शाखा आणि पिंपरी विभागाचे सहाय्यक आयुक्त , वरीष्ठ पोलीस निरीक्षक , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे . अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत .