breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात मास्क न घालणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; 25 लाखांपेक्षा जास्त दंड वसुल

कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी मास्क घालण किती महत्त्वाचं आहे हे सर्वांना माहित आहे. मात्र तरिही काही ठिकाणी लोकं मास्क न घालता बिनधास्त बाहेर फिरताना पहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासन आणखी कंबर कसून मैदानात उतरलं आहे. पुण्यात मास्क न घालणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली जात आहे. पुण्यात तर तीन दिवसांत ५ हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

शहरात मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाईला पुणे पोलिसांनी जोरदार सुरवात केली आहे. गेल्या तीन दिवसात मास्क न घालणाऱ्या पाच हजार २०४ जणांवर पोलिसांनी कारवाइ केली आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. दररोज १२०० पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे नागरिकांना अनेक सवलती देण्यात आले आहेत. दुकाने, मॉल सुरू झाले आहेत. तसेच, प्रवास करण्याची बंदी हटविण्यात आली आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांनी सुरक्षित अंतर व मास्क घालणे या नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. तरीही अनेक ठिकाणी नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. तसेच, अनेकजण मास्क न घालता बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईला पुन्हा जोरदार सुरवात केली आहे. गेल्या तीन दिवसात पोलिसांनी तब्बल पाच हजार २०४ जणांस मास्क न घातल्याची कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २५ लाखांपेक्षा जास्त दंड वसुल करण्यात आला आहे. या पुढे देखील ही कारवाई सुरू राहणार आहे.

कोरोनाच्या संकटालारोखण्यासाठी मास्क घालण किती महत्त्वाचे आहे हे माहित असून देखील नागरिकांना मास्क घाला हे बजावून सांगावं लागत आहे , एवढच नाही तर पोलिसांवर नागरिकांकडून दंड वसूल करण्याची वेळ यावी हे खरचं खूप धक्कादायक आणि दुर्दैवी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button