Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
पुणे – सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस 16 ऑगस्टपर्यंत वीकेन्ड बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/pune-baramati-pune-train-672x420.jpg)
पुणे – दौंड ते सोलापूर स्थानकांदरम्यान लोहमार्गाच्या होणाऱ्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाकरिता या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येणार आहे. यामुळे दि. 16 ऑगस्टपर्यंतच्या दर शनिवारी आणि रविवारी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रेल्वे सुधारित वेळापत्रकानुसार सुटणार आहे. अन्य दिवशी गाड्या नियोजित वेळापत्रकानुसार धावणार आहेत.
पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस दि. 11 ऑगस्टपर्यंत दर शनिवारी आणि रविवारी रद्द करण्यात आली आहे. अन्य दिवशी ही गाडी नियोजित वेळापत्रकानुसार धावेल.
सोलापूर-पुणे डेमू दि. 12 ऑगस्टपर्यंत शनिवारी आणि रविवारी सोलापूर ते कुर्डुवाडीदरम्यान धावणार आहे. कुर्डुवाडी ते पुणे मार्गावर गाडी धावणार नाही. पुणे-सोलापूर डेमू दि. 12 ऑगस्टपर्यंत दर शनिवारी आणि रविवारी केवळ पुणे ते भिगवणदरम्यान धावणार आहे