breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे-सातारा रस्त्यावर टेम्पोने अचानक घेतला पेट

पुणे – पुणे-सातारा रस्त्यावर वरवे (ता.भोर) येथे साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या टेम्पोने शनिवारी सकाळी अकरा वाजता अचानक पेट घेतला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही मात्र, संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला. त्यामुळे सुमारे एक तासभर पुणे-सातारा रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून हेल्मेट आणि पाथपोचा हे साहित्य घेऊन एक टेम्पो साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो वरवे येथे आला असता टेम्पोने अचानक पेट घेतला.

राजगड पोलिसांनी ताबडतोब दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली. काही वेळात अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाला. सुमारे अर्ध्या तासात टेम्पोची आग आटोक्यात आली. त्यानंतर राजगड पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरील टेम्पो बाजूला केला. या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही मात्र संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला.

सुमारे एक तासानंतर पुणे-सातारा रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली. तोपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button