breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर गुरुवारी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मेगा ब्लाॅक

पुणे – पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर उद्या (गुरुवारी) दुपारी 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुंबई-पुणे महामार्गवरुन जाणाऱ्या जड वाहनांना फूड मॉल जवळ थांबविण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकची दखल घेऊन वाहन चालकांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिस विभागातील अधीक्षक विजय पाटील यांनी केले आहे.

मुंबई-पुणे महामार्ग दोन तास बंद राहणार आहे. द्रुतगतीवरील किलोमीटर क्र. १० जवळ दिशादर्शक फलक ओव्हरहेड गंट्री बसविण्याचे काम रस्ते विकास महामंडळाच्यावतीने १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाताना द्रुतगती मार्ग २ तास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

त्यानुसार खालापूर टोल नाका – खालापूर गाव – खालापूर फाटा – शेडुंग टोल – अजिवळी फाटा – पुन्हा एक्स्प्रेस वे वर वाहन चालकांना जाता येईल, असे महामार्ग पोलिसांनी कळविले आहे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button