breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठा आरक्षण ; पुणे जिल्हाधिकारी इमारतीवरून उडी मारुन बलिदान देवू – सतीश काळे

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  वर्षभर सुरु असलेल्या मराठा मूक मोर्चाचे रुपांतर ठोक मोर्चात झाल्यानंतर अतिशय शांततेत असलेले हे आंदोलन आता चिघळले आहे. एवढेच नाही,तर आता त्याने उग्र रुप धारण केले आहे.त्याची तीव्रता आता राज्यभर पसरू लागली आहे.

मराठवाड्यातील मराठा तरुणांच्या आत्महत्येचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रात येण्याची भीतीने पोलिस चिंतेत पडले आहेत. तसेच वैयक्तिक आत्महत्या सत्राला आता सामूहिक स्वरुप मिळण्याची भीतीही निर्माण झाली आहे. कारण आता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवरून एक नव्हे,तर दहा मराठा मोर्चा आंदोलकांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा आज दिल्याने पोलिसांची झोप उडाली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील काकासाहेब शिंदे या मराठा आंदोलकाने नदीत उडी मारून जीव दिल्यानंतर हे आंदोलन आता अधिक चिघळले आहे. त्यात याच कारणातून विष घेतलेल्या दुसऱ्या तरुणाचा काल मृत्यू झाल्याने त्यात आणखी भर पडली आहे. हे कमीच म्हणून की काय आता सामूदायिक आत्महत्या करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे पिंपरी-चिंचवड समन्वयक सतीश काळे यांनी आज प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिला आहे.

प्रसिद्धिपत्रकात काळे म्हणतात, की आमचा कार्यकर्ता काकासाहेब शिंदे व या आंदोलनात हृदयविकाराने मृत्यू पावलेले पोलिस हवालदार शाम काटगावकर या दोघांच्याही बळी जाण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत.त्यामुळे त्यांच्याविरुद्ध या दोन्ही घटनांत खूनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.तसेच या बळी पडलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये मदत द्यावी. या दोन्ही मागण्या मान्य झाल्या नाहीत,तर दहा कार्यकर्त्यांसह मी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरून उडी मारून बलिदान करू.त्याला सर्वस्वी मुख्यमंत्रीच जबाबदार राहतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button