breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पीएमपीएल’च्या कर्मचा-यांना दिलासा, सेवेतील एक हजार 372 कर्मचा-यांना केले कायम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश, आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पुणे महानगर परिवहन महामंडळात कित्येक वर्षे रोजंदारी पध्दतीने काम करणा-या तब्बल एक हजार 372 कर्मचा-यांच्या आज (शुक्रवारी) दिलासा मिळाला आहे. सर्व कर्मचा-यांना पीएमपी सेवेत कायम स्वरुपी करण्याचा महत्वपुर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने घेण्यात आला. त्यामुळे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यातील कर्मचा-याना नियुक्त पत्र देखील वाटप करण्यात आले.

पुणे महानगर परिवहन महामंडळात गेल्या 12 ते 15 वर्षापांसुन रोजंदारी पध्दतीने शेकडो कर्मचारी काम करीत होते. त्या कर्मचा-यांना पीएमपीच्या सेवेत कायम करावे, अशी मागणी वारंवार केली जात होती. त्यानुसार तब्बल 1 हजार 372 कामगारांना कायमस्वरुपी सेवेत घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशाने पीएमपीने घेतला आहे. पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठनकर यांनी गेल्या आठ महिन्यापासुन लक्ष घातले होते.

याबाबत आमदार आण्णा बनसोडे आणि पीएमपी राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन सर्व पदाधिकारी यांचे उपस्थितीत 5 चालक, 5 वाहक,5 क्लिनर,5 स्वच्छता कर्मचारी या सर्व कामगारांना नियुक्ती पत्रे देण्यात आले.

कामगार युनियनचे सरचिटणीस सुनिल नलावडे म्हणाले की, शेकडो कर्मचा-यांना पीएमपी सेवेत कायम करण्याचा प्रश्न प्रलंबित होता. त्या कर्मचा-यांचा प्रश्न सोडविण्याची अजित पवार यांना विनंती केली. यावेळी दादांनी लगेच फोन करुन प्रशासनाला आदेश दिले. आमदार अण्णा बनसोडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कायम नियुक्ती करण्याचा निर्णय झाला.

पीएमपीएमएल राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेवक संदिप चिंचवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर ,सुनिल काटे,संतोष शिंदे,राहुल जोगदंड,प्रफ्फुल शिंदे निखिल कुंभार,आकाश तिवारी,विनायक वायकर,सचिन काळभोर,तुकाराम कारोटे यांनी आमदारांना पेढे भरवुन आमदारांचे मनापासुन आभार व्यक्त केले

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button