breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपळे निलखमधील महापालिकेच्या शाळेत पालकसभेला पालकांचा प्रतिसाद

  • नगरसेवक तुषार कामठे यांनी जाणून घेतल्या समस्या
  • शाळेतील अत्याधुनिक शिक्षण पध्दतीची दिली माहिती

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपळे निलख येथील महापालिकेची प्राथमिक शाळा क्रमांक 53 मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांची पालकसभा घेण्यात आली. येथील विद्यमान नगरसेवक तुषार कामठे यांनी शाळेतील उपलब्ध सोयीसुविधा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता याबाबत शिक्षक आणि पालक यांच्या मनातील शंका कुशंका दूर करण्याचा प्रयत्न केला.

ही पालकसभा शुक्रवारी (दि. २८) नगरसेवक कामठे यांनी आयोजित केली होती. कामठे यांनी शाळेतील उपलब्ध सोयीसुविधांची माहिती पालकांना दिली. शाळेचे सुसज्ज मैदान, भौतिक सुविधा, जिल्हा दर्जाची प्रयोगशाळा, रूम टू रीड वाचनालय, बजाज ई-लर्निंग संच, अक्षरभारती तर्फे संगणक प्रशिक्षण, ECA तर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, फ़िट्राम कंपनीच्या माध्यमातून प्रोजेक्टर व प्रत्येक वर्गात साउंड मेसेज सिस्टीम अशा विविध सोयीसुविधांची माहिती त्यांनी पालकांना दिली.

एवढ्या सोयीसुविधा असल्याने मनपाची ही शाळा खासगी शाळेप्रमाणे गुणवत्तेचा दर्जा उंचावणारी ठरत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना खासगी शाळेत प्रवेश घेण्याऐवजी मनपाच्या या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा. शाळेत मुलांच्या बौध्दीक वृध्दीबरोबरच शारिरीक सुदृढतेवर देखील भर देण्याला प्राधान्य असते. त्यामुळे विद्यार्थी बौध्दीक आणि शारिरीक या दोन्ही अंगांनी सक्षम बनल्याशिवाय राहत नाही. शाळेची यावर्षीची विद्यार्थी संख्या 700 वर पोहोचली आहे, असे कामठे यांनी सभेत सांगितले. यावेळी पालकांच्या समस्या देखील त्यांनी समजून घेतल्या. तत्काळ शाळा व्यवस्थापनासोबत चर्चा करून त्याचा निपटारा करण्यावर त्यांनी भर दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button