पिंपळे गुरव – सांगवी परिसरात रस्ते खोदकामामुळे पाणी गळती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/4d2c9daaff6f77f0a27be52bdec4a3cd.jpg)
पिंपरी – सांगवी – पिंपळे गुरव परिसरात रस्ते खोदकाम व अंतर्गत चेंबर दुरुस्तीसाठी खोदकाम सुरु आहे. या खोदकामामुळे अनेक ठिकाणी नळ तुटून पाणी गळती होत आहे. महापालिका प्रशासनाने एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला असतांना पाणी गळती होऊन पाण्याची नासाडी व अपव्यय होत आहे. तरीही पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
सांगवी – पिंपळे गुरव मध्ये गेल्या तीन दिवस पूर्वी सतत दररोज पाणी पुरवठा विभागाकडून लक्ष दिल्याने टाकीतून पाणी वाया गेल्याची घटना ताजी असताना आता परिसरात महापालिका ठेकेदाराकडून विविध ठिकाणी रस्ते दुरुस्ती व चेंबर बसवण्यासाठी खोदकाम केले जात असून काटे पुरम चौक गेल्या तीन महिन्यापासून वाहतुकीच्या कोंडीमुळे अडचणींचा ठरत असून या परिसरातील नेताजी नगर येथील गल्ली क्रमांक दोनच्या शेवटी व राजीव गांधी नगर लागून असलेल्या रस्त्यावर नळ गळतीमुळे पिण्याच्या पाण्याची गळती होत आहे. या भागात रात्री सात वाजता पाणी पुरवठा होत असल्याने महापालिका कर्मचारी व इतर कुणाला याबाबत माहिती मिळत नसल्याने दुरुस्ती रखडली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी येथील पाईपलाईन दुरुस्ती लवकरात लवकर करावी व वाया जाणारे पाणी वाचवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.