Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपळे गुरव येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रास मंजुरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/3Maharashtra_Kamgar_Kalyan_m.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिंपळे गुरव येथे कामगारांच्या कल्याणकारी योजना कामगारापर्यत पोहोचण्यासाठी कामगार कल्याण केंद्राला मंजूरी मिळाली आहे. अनेक वर्षांपासून कामगारांची मागणी करण्यात येत होती. त्या कामगार कल्याण मंडळाचे केंद्र होण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रयत्नातून झाले आहे. याकरिता आण्णा जोगदंड यांनी सतत पाठपुरावा केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गूरव येथील शाळेतील काही खोल्या कामगार कल्याण केंद्रास दिल्याचे पत्र आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी आम्हाला दिले आहे. असे संत तुकाराम नगरचे केंद्र संचालक सुरेश पवार आणि प्रदिप बोरसे यांनी सांगितले. पिंपळे गुरवला कामगार कल्याण केंद्र लवकरात लवकर चालू करू असे सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त समाधान भोसले यांनी सांगितले. या केंद्रामुळे नवी सांगवी, सांगवी, पिंगळे गूरव ,पिंगळे सौदागर, पिंपळे निलख,काळेवाडी, रहाटणी,थेरगाव, दापोडी, बोपोडी,याच बरोबर अनेक उपनगर हे या केंद्राशी जोडणार आहोत. यामुळे कामगारांना वेळ वाचणार आहे, असे सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त समाधान भोसले यांनी सांगितले.