breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरवला आईच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन केले गंभीर जखमी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – भावाला टोमणे मारुन का बोलतोस? असे विचारल्याने मुलाने त्याच्या आईच्याच डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ८) सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथील राजीवगांधीनगरमध्ये घडली.

शामल अरुण भुजबळ (वय ५५, रा. राजीवगांधी नगर, पिंपळे गुरव) असे जखमी आईचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलगा अमित अरुण भुजबळ (वय ३५ रा. राजीवगांधी नगर, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित हा फिर्यादी शामल यांचा सख्खा मुलगा आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास तो पिंपळे गुरव येथील घरी आला होता. यावेळी तो त्याच्या भावाला शाब्दिक टोमणे मारून बोलत होता. शाब्दिक टोमण्यांचा वाद वाढू नये यासाठी आई शामल यांनी मध्यस्थी करत अमितला, भावाला टोमणे का मारतोस? असे विचारले. यामुळे रागावलेल्या अमितने घराबाहेर पडलेला सिमेंटचा गट्टू शामल यांच्या डोक्यात मारला. यात शामल गंभीर जखमी होऊन बेशुध्द झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी मुलगा अमित विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीला अमितला अद्याप अटक करण्यात आलेली नसून सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button