पिंपळे गुरवमध्ये राहत्या घरात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
![Shocking! The body of an 89-year-old mother was found hidden in the house at a cost of Rs 43 lakh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/murder-crime.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपळे गुरव येथील एका घरात 65 वर्षीय वृद्धाचा कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार रविवारी (दि. 10) दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आला.
चंद्रकांत गेनू भोसले (वय 65, रा. सुवर्णपार्क, पिंपळे गुरव) असे मृतदेह आढळलेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चंद्रकांत यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. तेव्हापासून ते त्यांच्या लहान मुलासोबत पिंपळे गुरव येथे राहत होते. त्यांचा मुलगा तीन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेल्याने ते एकटेच घरात होते.
दरम्यान, चंद्रकांत यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडले असता चंद्रकांत यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. चंद्रकांत हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.