breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी युवासेनेकडून मजुरांना किराणा मालाचे वाटप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

सध्या संचारबंदीमुळे मोल मजूरीची कामे बंद आहेत. हातावरचे पोट असल्याने एकवीस दिवस घरामध्ये बसुन अनेक कुटूंबांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. फुगेवाडीत काही लोक हे कामासाठी वास्तव्यास आले आहेत. कमीत कमी 100 ते 108 पर्यंत लोकसंख्या आहे. आज त्यांचा ठेकेदार 7-8 दिवसापासून गायब झाला आहे. त्यामुळे त्या कुटुंबीयांना उपासमारीची वेळ आली होती.

त्या 30 कुटुंबीयांसाठी किराणा मालाचे किट बनविले आहे. कोठेही गर्दी न करता social distancing पाळत लाभार्थींना मदत केली. साधारण १५ दिवस पुरेल ईतका किराणा माल सदरील किटमध्ये आहे. घरातील किराणा माल संपल्याने ही सगळी कुटुंबे मदतीच्या प्रतीक्षेत होती. किराणा माल मिळाल्याने कुटूंबीयांना प्रचंड आनंद, समाधान व दिलासा मिळाला. हे किराणा मालाचे किट तात्या तापकीर ह्यांच्या हस्ते देण्यात आले. ह्यावेळी पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला गटाच्या शीला जाधव, नंदू काची, रुपेश गायकवाड, महेश बोधले, हर्षल वाणी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button