breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी महापालिकेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन
पिंपरी, ( महा ई न्यूज ) – दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शहर सुधारणा समितीच्या सभापती सीमा चाैगुले, नगरसेवक शत्रुघ्न काटे, अनुप मोरे, अजय पाताडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, भाजपचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम केले. त्यांचे स्थान कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या मनात आजही कायम आहे. गोपीनाथ मुंडे यांची स्मृती लोकांच्या मनात चिरकाल स्मरणात राहावी अशी आहे. त्यांचे महाराष्ट्र विकासाचे स्वप्न साकार करणे आणि त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने वाटचाल करणे, हीच त्यांना ख-या अर्थाने अभिवादन ठरेल अशा शब्दांत पवार यांनी मुंडे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.