breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब; सदस्यांची निवड लांबणीवर

पिंपरी |महाईन्यूज|

भाजपचे दिवंगत नगरसेवक लक्ष्मण उंडे यांच्यासह अन्य मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहून पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 13) दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, कला-क्रीडा व सांस्कृतिक आणि शिक्षण या पाच विषय समित्यांच्या सदस्यांची निवड आठवडाभर लांबणीवर पडली आहे. आजच्या सर्वसाधारण सभेत ही निवड होणार होती. त्यावर 45 नगरसेवकांना सदस्यपदाची संधी मिळणार होती.

मुदत संपल्यामुळे महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला-क्रीडा व सांस्कृतिक समिती, या चार विषय समित्या 14 जून रोजी बरखास्त झाल्या आहेत. त्यानंतर पंधरा दिवसांनी शिक्षण समितीही बरखास्त झाली. त्या वेळी लॉकडाउन व जमावबंदी होती. त्यामुळे निवडणूक होऊ शकली नाही.

आता व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाइन निवडणूक घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सध्या विषय समित्यांचे अधिकार महापालिका सर्वसाधारण सभेकडे आहेत. मंगळवारी (दि. 6) दुपारी आयोजित सर्वसाधारण सभेत विषय समिती सदस्यांची निवड होणार होती. मात्र, मृतांना श्रद्धांजली वाहून सभा मंगळवार (दि.13) दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button