‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत कर्मचाऱ्यांची 50 टक्के उपस्थिती ठेवा’: कर्मचारी महासंघाची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/IMG_20200112_035429-300x204-1.jpg)
पिंपरी|
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मुंबईप्रमाणे पुण्यातही वाढतच चालला आहे… त्यामध्ये आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचाही समावेश झाला आहे…महापालिकेतील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे…त्यामुळे आता या परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी उपाय म्हणून मनपातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्यात यावी अशा अनेक मागण्यांसह पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील बहुतांश कर्मचारी कार्यरत आहेत…मात्र या कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होत आहे.यापुर्वी करसंकलन विभागीय कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होत. तसेच मुख्य कार्यालयातील स्थापत्य विभाग व वैद्यकीय विभागातीलही काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाली..त्यामुळे सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे…या परिस्थितीमुळे कार्यालयात येऊन कामकाज करणं सर्वांनाच भितीदायक आणि धोक्याचं वाटत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून चिंचवडे यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे.
या सर्व परिस्थितीवर खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक विभागातील कर्मचारी वगळता इतर विभागात कर्मचाऱ्यांंची उपस्थिती 50 टक्के करण्यात यावी. तसेचं मनपा हद्दीबाहेरूनव कन्टेनमेंट झोन मधून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कामावर येण्याची सक्ती करण्यात येऊ नये,ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण किंवा संशयित आढळतील अशा विभागातील इतर कर्मचाऱ्यांची तातडीने कोरोनाची तपासणी करण्यात यावी, एवढचं नाही तर मनपातील जे कर्मचारी कोरोनाबाधित आढळतील किंवा संशयित म्हणून आढळतील अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी आणि नंतर त्यांच्या विलगीकरणासाठी मनपाचे असलेले जिजामाता रुग्णालय, वैद्यकीय कोरोना तपासणी यंत्रणा आणि इतर सुविधेसह राखीव ठेवण्यात यावे ,अशा अनेक मागण्यांसह चिंचवडे यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे.. या सर्व मागण्या महापालिकेतील प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांचे कोरोनापासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात आणि आयुक्तांनी संबंधितांना याबाबत पुढील आदेश द्यावे ,अशीही मागणी चिंचवडे यांनी आयुक्तांना निवेदनात केली आहे.